13 July 2020 1:21 PM
अँप डाउनलोड

आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्षच किंगमेकर: चंद्राबाबू

विजयवाडा : आज टीडीपीच्या वार्षिक संमेलनाचे उद्धाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना चंद्राबाबूंनी भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवत चंद्राबाबू म्हणाले की, २०१९ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

टीडीपीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चंद्राबाबू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ प्रचार करणारे आणि आश्वासन न पाळणारे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अटळ असल्याचे चंद्रबाबू म्हणाले. टीडीपीने मोदी सरकारमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. तसेच टीडीपी पक्षाकडे देशाचे राजकारण बदलण्याची शक्ती आहे. तसेच २०१९ मधील निवडणुकीत मोदींचा रथ रोखण्यासाठी टीडीपी पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचे संकेतही चंद्राबाबूंनी यावेळी दिले.

तसेच २०१९ च्या निवडणुकीनंतर सर्व राज्यातील प्रादेशिक पक्ष हे किंगमेकर ठरतील हे त्यांनी ठाम पणे सांगितलं. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागणार आहे, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x