2 June 2023 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

VIDEO | ठाणे, कल्याण-डोंबिवली, भांडुपवरून गर्दी जमवली, मोदी भक्त शिंदेंचं कोकणात हजारो कोटीचे गाजर वाटप, भाषणावेळी स्थानिक निघून गेले

VIDEO

VIDEO | 5 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भारतीय पक्षावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता त्याच गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. याच मैदानात फुसका बार येऊन गेला, आपटी बार येऊन गेला,अशा शब्दात शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच गेले सहा महिने थयथयाट, आदळआपट सुरू आहे. सभेची जागा बदलतेय, पण तेच टोमणे तेच भाषण सूरू आहे, खोके, गद्दार हेच शब्द आहेत, अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली.

तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी (शरद पवार) मुख्यमंत्री पदाचा बल्ब पेटवला, आणि सगळचं बिघडलं, वाईट होते ते सगळे चांगले झाले आणि सगळ विसरून गेलात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच हा एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, त्याने कधी बेईमानी केली नाही. ही बेईमानी माझ्या रक्तात नाही, हा सत्तेसाठी मिंधा झाला नाही, होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी खेडच्या सभेत व्यक्त केला.

बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी
बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी, गद्दारी आणि विश्वासघात केला, फक्त मुख्यमत्री पदाच्या खुर्चीसाठी अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.सत्तेसाठी तडजोड करताय म्हणून आम्हाला हा निर्णय़ घ्यावा लागला,असे देखील शिंदे यांनी म्हटले. अशोच चव्हाण मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणाला होतात त्यांनीच शेण खाल्लय, मग आता तु्म्ही त्यांच्या पक्तीत बसून तुम्ही काय खाताय? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

कोण कोणाला डोळा मारत होते, हे तुम्ही पाहिलंत. अजित दादांनीच मारला. ज्या लोकांच्या गळ्यात गळे घालतायत तेच उद्या तुमचा कधी गळा दाबतील, हे तुम्हाला कळणार नाही. हा त्यांचा पुर्व इतिहास तपासून पाहा, असा सल्ला देखील शिंदे यांनी ठाकरे यांना दिला. तसेच सत्तेसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पक्ष दावणीला बांधलात, धनुष्यबाण गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचे काम केले, आणि शिवसेना वाचवण्याचा काम केले असे देखील शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

शिंदेंकडून साताऱ्याला दिलं नाही तेवढं गाजर वाटप कोकणात :
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका काही महिन्यात आल्याने भाजपचं तंत्र अवलंबल्याचं म्हटलं जातंय. कारण, मूळचे साताऱ्याचे असलेले एकनाथ शिंदे यांनी सातारकरांना जेवढी निवडणुकीची गाजर वाटली नसतील तेवढी कोकणातील सभेत वाटली असं दिसतंय. स्थानिक नेत्यांनी माहिती पुरवल्याप्रमाणे त्यांनी अनेक प्रकल्पांची नावं घेत शेकडो आणि हजारो कोटीच्या निधीच्या घोषणा केला. भाजप हेच तंत्र निवडणुका आल्यावर वापरतं हा इतिहास आहे. मी मोदी भक्त असं जाहीरपणे यापूर्वी सांगणारे एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील एकूण मुद्दे हे भाजपच्या मुद्द्यांप्रमाणे असल्याने त्यांना हे मुद्दे भाजपने सुचवले होते का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे शिंदे हे रटाळ भाषणासाठी प्रसिद्ध आहे हे वास्तव आहे आणि त्यामुळे त्यांचा सभेतील लोकांवर कधीच थेट प्रभाव नसतो हे ठाणे, मुंबई आणि आता कोकणात दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु असताना हजारो लोकं मोठ्या जमावाने बाहेर निघून जातं होती. वरून फिरणारे ड्रोन विशिष्ट रो मध्ये फिरवले गेले आणि गर्दी भासवली गेली. मात्र पाठच्या बाजूला खाली खुर्च्यांचे खच पडले होते. लोकं थांबायला तयार नव्हती आणि मोठ्या जमावाने बाहेर जाताना कॅमेऱ्यात प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामुळे येथेही पैशाचा जोरावर माणसं जमवली गेल्याच म्हटलं जातंय.

Video Courtesy – Mumbai Tak

News Title: VIDEO of Khed rally trending on social media check details on 19 March 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x