15 December 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर'मध्ये महिना उलटूनही दंगल थांबेना, हजारो बेघर-शेकडो मृत्युमुखी, मोदी सरकारमधील मंत्र्यांचे बंगले पेटवायला सुरुवात

Manipur Violence

Manipur Violence | मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत, तसेच भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये महिना उलटूनही दंगल थांबेना आणि त्यात हजारो लोकं बेघर झाली असून शेकडो लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. परिणामी जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड रोष उफाळून आला असून मणिपूरमधील भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यास सुरुवात झाली आहे.

इंफाळमधील कोंगबा येथील केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानाला जमावाने गुरुवारी रात्री उशिरा आग लावली. मणिपूर सरकारने ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री म्हणाले की, मी सध्या अधिकृत कामानिमित्त केरळमध्ये आहे. सुदैवाने काल रात्री माझ्या घरात कोणीही जखमी झाले नाही. जमावाने पेट्रोल बॉम्ब आणले होते आणि माझ्या घराच्या तळमजल्याचे आणि पहिल्या मजल्याचे नुकसान झाले आहे अशी त्यांनी माहिती दिली.

या हिंसाचारावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, “माझ्या गृहराज्यात जे काही घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी शांततेचे आवाहन करत राहीन. अशा प्रकारचा हिंसाचार करणारे पूर्णपणे अमानुष आहेत. ही घटना कोंगा नंदीबाम लेकाई भागात रात्री दहाच्या सुमारास घडली. अग्निशमन दल आणि सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. घरांचे आणि उभ्या असलेल्या काही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

यापूर्वी देखील सत्ताधाऱ्यांच्या घरांवर हल्ले
केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २३ मे रोजी जमावाने त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. परिसरात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करून उपद्रवींना पांगविण्यात यश मिळवले होते.

मणिपूरमध्ये ३ मेपासून मेइतेई आणि कुकी समुदायात झालेल्या जातीय संघर्षात ११५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि हजारो लोकं बेघर झाली आहेत. बुधवारी मणिपूरमधील एन बीरेन सिंग सरकारमधील एका मंत्र्याच्या सरकारी निवासस्थानालाही अज्ञात्यांनी आग लावली होती. कांगपोकपीचे भाजपचे आमदार नेमचा किपगेन हे राज्याचे उद्योगमंत्री आहेत. मणिपूरच्या मंत्रिमंडळात त्या एकमेव महिला आहेत.

पहिली घटना 4 मे रोजी घडली होती जेव्हा इम्फाळमध्ये जमावाच्या हल्ल्यात भाजपचे आमदार वुंगजगीन वॉल्टे जखमी झाले होते. या आमदारावर सध्या दिल्लीत उपचार सुरू आहेत. 24 मे रोजी इम्फाळमध्ये भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री गोविंददास कोंथौजम यांच्या घराची जमावाने तोडफोड केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे मंत्री टी. विश्वजीत सिंह यांच्या इंफाळ येथील निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

News Title : Manipur Union minister house set on fire by mob with petrol bombs check details 16 June 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Violence(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x