16 July 2020 12:06 AM
अँप डाउनलोड

चालू आर्थिक वर्षात २००० ची एकही नोट छापली नाही

RBI, Demonetization, 2000 Notes

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं ही माहिती दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने आरबीआयकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यावर ‘आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. २०१८-१९मध्ये ४.६६ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही’, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर नव्याने ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. तसेच १०, २०, ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या गेल्या आहेत. दरम्यान, ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली.

गेल्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. २०१८-१९मध्ये चलनातील २०००च्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या. रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार, बनावट नोटांची संख्या तेजीनं वाढत आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीनंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. तर २०१७मध्ये पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. आर्थिक वर्ष २०१७-१८च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांमध्ये १२१ टक्क्यांनी वाढ झाली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x