27 April 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ज्या पेढ्यावरून मोदींची खिल्ली उडवली त्या 'सातारी कंदी पेढ्याचा' हार मोदींना घालणार?

Satara By Poll, Udayanraje bhosale, NCP, PM Narendra Modi

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून खासदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील होणार आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना थांबवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजेंशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी ‘मी जातोय. मला संपर्क करु नका’, असं सांगितल्याची माहिती मुंडे यांनी दिली होती.

दरम्यान, नोटबंदीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवताना म्हटलं होतं, कोण कुठला मोदी, कोण मोठा लागून गेला आहे काय, साताऱ्यात इकडे मोदी पेढेवाले आहेत’, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली होती. मात्र आज त्याच मोदींच्या उपस्थितीत आणि त्यांच्यासमोर नम्र होत सातारी कंदी पेढ्याचा हार मोदींना घालणार असल्याचं वृत्त आहे.

आज साताऱ्यातील मोदींच्या सभेमुळे सैनिक स्कुल परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे. तसेच प्रत्येक मार्गावर चौका चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मोदींच्या स्वागतासाठी भाजप सज्ज झाले असून सभेला मोदींसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि भाजपचे उमेदवार यांनाच व्यासपीठावर परवानगी आहे. मोदी काय बोलणार याची सातारकरांना उत्सुकता लागली आहे. उदयनराजे भोसले पंतप्रधान मोदींना सातारी कंदी पेढ्याचा हार, रायगडावरील मेघडंबरीचे स्मृतिचिन्ह, चांदीची राजमुद्रा आणि तलवार भेट देणार आहेत.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x