20 June 2021 3:08 PM
अँप डाउनलोड

मुक्ताईनगर भाजप मुक्त होण्याच्या दिशेने | भाजपच्या आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

BJP Maharashtra

मुंबई, २६ मे | भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व 10 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक हे गुलाबराव पाटील यांच्यासह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या 10 नगरसेवकांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची प्रक्रिया राबवल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: The Shiv Sena has dealt another major blow to the Bharatiya Janata Party. 10 corporators of Muktai Municipality in Jalgaon have arrived at the Varsha residence of Chief Minister Uddhav Thackeray. All these 10 corporators have joined Shiv Sena. After Jalgaon Municipal Corporation, now the corporators of Muktai Municipality have left the party, which is said to be a big blow to BJP

News English Title: BJP Jalgaon Muktainagar Nagarpalika 10 corporators join Shivsena in presence of CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1097)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x