28 March 2023 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा Tax Exemption Claim | तुमच्या पगारात DA, TA, HRA सह इतर अनेक भत्ते असतात, कशावर किती टॅक्स सूट मिळते पहा SBI FD Vs SBI Annuity Deposit Scheme | दर महिन्याला कमाईसाठी SBI ची कोणती योजना बेस्ट? दर महिन्याचा खर्च भागेल Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या
x

मंत्रालयात उंदीर घोटाळा, 'उंदीर मामा' मेले पण सरकारी 'भाचे' अखेर मोकाट ?

मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माजी महसूल मंत्री आणि भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील ‘उंदीर घोटाळा’ उघडकीस आणला, ज्यामुळे राज्य सरकारच चांगलच हसू झालं आहे. एका खासगी संस्थेने म्हणजे अशी संस्था जिचं कार्यालय कुठे आहे तेच माहित नाही अशा संस्थेला हे काम देण्यात आलं. या संस्थेने राज्याच्या मंत्रालयात केवळ ७ दिवसात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला.

त्यावर भाजपचे आमदार राम कदमांनी असं स्पष्टीकरण दिल की, ३ लाख १९ हजार ४०० ही उंदरांची संख्या नसून त्या उंदरांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्यांची संख्या आहे. परंतु ७ दिवसात या ३ लाख १९ हजार ४०० गोळ्यांनी किती उंदीर मेले याच काहीच स्पष्टीकरण राम कदमांनी दिलं नाही. तसेच जर त्या गोळ्यांची संख्या ३ लाख १९ हजार ४०० इतकी मोठी होती तर त्या मंत्रालयात डंपरने उतरवून मग खोऱ्याने संपूर्ण मंत्रालयात पसरवल्या का याच कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

केवळ भाजप मधल्या एका आमदाराच्या प्रश्नाला भाजपच्याच दुसऱ्या आमदाराने एक टोला लगावला की, खडसेंनी डोंगर पोखरून उंदिर काढला. बस झालं संपवला विषय इतक्यावरच काही थातुर-मातुर उत्तर देऊन. घोटाळा हा घोटाळा असतो आणि त्या घोटाळ्याची रक्कम किती लहान किंव्हा मोठी आहे यावर कदाचित त्या घोटाळ्याकडे जनतेने कस पाहावं हे ठरत असावं. म्हणूनच की काय भाजप आमदार राम कदमांनी स्पष्टीकरण देताना एक गोळी ‘केवळ दीड रुपया’ इतकीच आहे यावर जास्त जोर दिला आहे.

महाराष्ट्र मंत्रालयातील हा उंदीर घोटाळा, त्याचा दर्जा आणि त्यावर बाहेर आलेली स्पष्टीकरणं बघून महाराष्ट्रातील जनतेवर केवळ “उंदीर मामा की जय” बोलण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही. मंत्रालयातील ‘उंदीर मामा’ तर मेले, पण त्यांचे ‘सरकारी भाचे’ मात्र स्वस्तात मोकाट सुटले एवढंच जनतेने काय ते समजून घ्यावं.

या उंदीर घोटाळ्यातून एकच गोष्ट जनतेला उमगली आणि ती म्हणजे सरकारी कार्यालयातील ‘फाईल्स’ हे मारले गेलेले उंदीरमामा’ नाही तर ‘सरकारी भाचे’ कुरतडत असतात जे अस्तित्वात नसलेल्या कंपनीला कामाचा ठेका देत असतात आणि बदनाम होतात ते बिचारे उंदीरमामा.

उद्या याच ‘गणपतीबाप्पा’ प्रेमी मराठी माणसाने ‘उंदीर मामा की जय’ म्हणत सरकारलाच मतदान पेटीतून कुरतडून टाकलं तर नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Rat Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x