6 May 2021 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी मोदींच्या वाराणसीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा | गरजेच्यावेळी आमचे खासदार नरेंद्र मोदी कुठे आहेत? जनतेचा सवाल
x

पुणे | लॉकडाऊनचा निर्णय लवकर जाहीर करा | संपूर्ण लॉकडाऊन झाला तरच पाठिंबा - व्यापारी

Pune Lockdown

पुणे, १३ एप्रिल: राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे असताना आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लवकर जाहीर केला नाही तर आम्ही दुकानं उघडू, असे पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन नसेल तर आम्ही बुधवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

 

News English Summary: Traders in Pune have now given an ultimatum to the Thackeray government as the state is on the verge of lockdown due to the rising incidence of corona. If the Thackeray government does not announce the decision of lockdown soon, we will open the shop, said the traders in Pune.

News English Title: Traders in Pune have now given an ultimatum to the Thackeray government on lockdown news updates.

हॅशटॅग्स

#Pune(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x