23 April 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू

India Corona Pandemic

नवी दिल्ली, १३ एप्रिल: देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

देशात आतापर्यंत जवळपास 1.37 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1.22 कोटी बरे झाले आहेत. 1 लाख 71 हजार 89 जणांनी जीव गमावला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या या महिन्यात 11 दिवसांमध्येच 6 लाख 78 हजार 519 नी वाढली आहे. 1 एप्रिलला 5 लाख 80 हजार 387 अॅक्टिव्ह रुग्ण होते. जे वाढून 12 लाख 58 हजार 906 झाले आहेत. सोमवारी यामध्ये 62,946 ची वाढ झाली.

दरम्यान, कोविड निर्बंधांचे पालन लोक कमी प्रमाणात करीत आहेत, त्याशिवाय कोविडच्या जास्त संसर्गजन्य विषाणूचे प्रकार भारतातही आले आहेत, यामुळे सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे, असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या देशात करोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांची संख्या काही राज्यात वेगाने वाढताना दिसत आहे.

 

News English Summary: The corona is gaining momentum in the country. 1 lakh 60 thousand 694 new patients were found on Monday. 96,727 were cured and 880 died. This was the second day in a row when more than 1 lakh 60 thousand new patients were found. The corona report of 1 lakh 59 thousand 914 patients was positive on Sunday.

News English Title: Increase in corona patients due to violation of restrictions rapidly spreading toxins news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x