29 November 2020 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आधी शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी | आता आजींची खिल्ली उडवली | कंगनाचा मुजोरपणा उच्चांकावर पवार कुटुंबानं स्वप्नातलं सत्यात उतरवलं | म्हणून तर १०५ आमदार असून घरी बसावं लागलं घोटाळे आणि भाजप नेत्यांशी आर्थिक कनेक्शन | सुनील झंवर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे घटनेचे साक्षीदार राऊत | त्या सकाळच्या शपथविधीवर खुलासा | म्हणजे पुस्तकी दावे खोटे? पीडीपी आणि जेडीयूसोबत युती करतात तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे जातं? - आदित्य ठाकरे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं आवाहन | केंद्रासोबत चर्चा होणार महिन्याला 4-5 कोटी डोसची निर्मिती | 60 टक्के लोकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही
x

कोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती

Maharashtra State, Dashboard covid 19

मुंबई, २२ मे: केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोना आपत्तीने थैमान घातलं आहे. देशाचा विचार करता सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्यात दिवसेंदिवस वाढ होतं आहे. मात्र सध्याच्या घडीला सर्वात मोठी अडचण म्हणजे सामान्य माणसाला राज्यभरात किती आयसोलेशन सेंटर्स आहेत, बेड्सची संख्या किती, किती बेड्स व्यापलेले आणि किती शिल्लक, कोरोना केअर सेंटरचा पत्ता, फॅसिलिटी कोड कोणता, ऑक्सिजन आणि वेल्टीलिटर उपलब्धता, कोरोना टेस्ट लॅब, संबंधित लॅब मध्ये कोणत्या प्रकारची टेस्ट ICMR ने मान्य केली आहे, याबाबद्दल एका क्लिकवर कोणतीही माहिती सामान्य लोकांना आज प्राप्त होतं नाही.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पोलिसांना देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने त्यांना देखील स्वतःसाठी उपलब्ध असलेल्या सेवेची माहिती एका क्लिकवर मिळत नाही. त्यामुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र आरोग्य सुविधा वाढविण्याच्या आकडेवारीनुसार राज्य सरकार चांगलं काम करतंय, पण ते लोकांपर्यंत एका क्लिकवर पोहोचत नसल्याच्या राज्यभरातून तक्रारी येतं आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रनामा न्युजने एक सोशल इनिशिएटिव्ह घेऊन अत्याधुनिक अँप बनवून त्याच्या होमस्क्रिन्वर सर्वच प्रकारची माहिती एका क्लिकवर देण्याची तरतूद केल्याने सरकारची मोठी अडचण दूर होऊ शकते. मात्र सदर अँपसाठी सरकारची अधिकृत मान्यता लागत असल्याने आम्ही राज्य सरकारला भेट मिळावी यासाठी आग्रहाची विनंती करत आहोत. यासाठी माननीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी वेळ दिल्यास त्यांना संपूर्ण विषय समजावून दिला जाईल.

 

News English Title: Maharashtra State Dashboard for covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x