9 May 2021 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

सत्य समोर येताच रेणू शर्मा यु-टर्न मारण्याच्या तयारीत? | केले ट्विट वर ट्विट

Renu Sharma, minister Dhananjay Munde

मुंबई, २५ जानेवारी: बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत.

दरम्यान भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मनसेचे मनीष धुरी यांनी देखील सत्य समोर आणल्याने रेणू शर्माच्या अडचणी वाढल्या होत्या.

तक्रारदार महिलेने ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने देव तुमचं भलं करो असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

 

News English Summary: The complainant tweeted, “Do one thing, you all decide, those who don’t know me when they don’t know anything and those who do know are making false accusations.” All of you decide together, I withdraw what you want. If I was wrong, why haven’t these people come forward yet? I am proud of myself even though I stepped back. I am the only girl in the whole of Maharashtra who is fighting. I did not name any party and these people have come together against me, write what you want, Renu Sharma wrote in a tweet that God bless you.

News English Title: Renu Sharma made multipal twits after allegations on minister Dhananjay Munde news updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x