26 April 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मुंबई: PMC बँक आणि आरे वृक्षतोडीचा फटका युतीला बसण्याची शक्यता: सविस्तर

Maharashtra Vidhansabha Election 2019, BJP, Shivsena, PMC Bank, Save Aarey, Save Forest, RBI

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी पीएमसी बँकेतील गैरव्यवहारांचा आणि आरेतील मोठ्याप्रमाणावरील वृक्ष तोडीच्या मुद्द्यांमुळे भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्यातरी लाखो सामान्य ग्राहकांच्या मनातली आग तशीच धगधगत आहे आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावर पडतील असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.

प्रसार माध्यमांनी देखील हा मुद्दा उचलून धरल्याने आणि विरोधकांनी देखील या विषयावरून सरकारला प्रचारात धारेवर धरल्याने सदर विषयचं गांभीर्य अधिकच गडद झाल्याचं पाहायला मिळालं. एकूणच मागील काही दिवसांपासून बँकिंग व्यवस्थेवरील सामान्य माणसाचा विश्वासच कमी झाला आहे आणि त्यात सहकारी बँकेत पैसे ठेवावे की नाही असा प्रश्न अनेक लोकं उपस्थित करत आहेत.

सामान्य लोकांच्या आयुष्याची मिळकतंच बुडीत निघाल्याने आत्तापर्यंत ४ जणांनी धक्का सहन न झाल्याने स्वतःचे प्राण गमावले आहेत. त्यानंतर सामान्य लोकांमध्ये सरकारप्रती रोष अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी प्रचारात या मुद्यांना बगल दिल्याने सामान्य ग्राहकांचा सरकारवरील विश्वासच संपलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व गंभीर घटक्रादरम्यानच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे बँकेतील वरिष्ठांसोबतचे संबंध समोर आल्याने सरकाबद्दलचा राग अजूनच दुणावला आहे. याच बँकेचे लाखो ग्राहक मुंबईत असून त्याचा थेट फटका सत्ताधाऱ्यांना बसणार हे निश्चित आहे, असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

त्यानंतर आरेतील वृक्षतोडी आणि सरकारच्या उद्दामपनाविरुद्ध मुंबई शहरातील हजारो तरुण, तरुणी, वरिष्ठ नागरिक, सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी आणि आदिवासी लोकं देखील रस्त्यावर उतरले होते. मात्र सरकारने राबविलेल्या दंडुकेशाहीमुळे सर्वांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं, जो आजही क्षमतेला नाही आणि त्यामुळे हा दोन घटना भाजप आणि सेनेला मतदानात फटका देणार असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x