17 May 2021 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे

नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शेलार यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, ‘लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी” पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात, त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष !आणि शेवटी मी !!अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!!,` असे त्यांनी यात म्हटले आहे.

दरम्यान, कालच सरसंघचालकांनी सुद्धा नागपूरमधील एका कार्यक्रमात मोदींच्या मुलाखतीवरून अप्रत्यक्ष भाष्य आणि सूचक इशारा दिला होता. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोहन भागवतांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकांबद्दल म्हटलं की ‘आम्हाला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल शंका आहे’. मोदींनी राम मंदिरापासून सर्वच विषयावर केवळ वेळ मारणारी उत्तर दिली होती, जी अनेकांना पटली नव्हती. त्यामुळे सरसंघचालकांनी सुद्धा थेट नाराजी व्यक्त करत, असंच असेल तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल आम्हाला शंका आहे, असा अप्रत्यक्ष सूचक इशारा दिला होता.

दरम्यान, मोहन भागवतांच्या त्याच वक्तव्याचा आणि मोदींच्या मुलाखतीचा संदर्भ देत, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे गजानन काळे यांनी ट्विट करत?

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(613)#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x