26 January 2025 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता
x

प्रसार माध्यमांची गळचेपी | आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? - शिवसेना

Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, २४ जुलै | दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.

लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार:
कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.

सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची:
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे र छापे पडले आहेत. आणि दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडले याच आश्चर्य आहे. तर वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अशा दडपशाहीविरुद्ध प्रत्येकानेच उभे राहिले पाहिजे. त्याच्याशी ‘सामना’ केला पाहिजे . ‘भास्कर’ ने लढण्याचा निर्धार केला आहे तसा ‘भारत समाचार’ ने केला आहे. आज दै . ‘भास्कर’, ‘भारत समाचार’ जात्यात आहे. सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची वाट पाहू नये, असेदेखील संजय राऊत म्हणाले.

झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही:
या वृत्तसमूहाचा व्याप खूप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्ट्यांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही.

सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’:
राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत. गंगेतून कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत आली तेव्हा त्यांचे पानभर छायाचित्र छापून त्यावर ‘भास्कर’ने शीर्षक दिले- ‘शर्मसार हुई गंगा!’ ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा श्वास कसा गुदमरत आहे ते याच ‘भास्कर’ने समोर आणले. मध्य प्रदेशात एप्रिल महिन्यात ऑक्सिजनअभावी 15 दुर्घटनांत 60 मृत्यू झाल्याचे ‘भास्कर’ने छापले. केंद्र सरकारचा दावा त्याने फोल ठरला. गुजरातमध्ये एका महिन्यात कोरोनामुळे 3,578 मृत्यू झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Criticism of Indian independence and democracy Shivsena criticizes Modi government news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x