27 September 2020 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रॅफीक पोलिसांना फसवणं विसरा | तुमची सर्व कागदपत्रं पोलिसांकडे मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
x

डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत

Partha Pawar, Padmasingh Patil Malhar Patil

उस्मानाबाद, १३ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शरद पवार यांनी नातवाला जाहीर फटकारल्यानंतर पवारांचे जूने शत्रु पद्मसिंह पाटील यांचे नातू आता पार्थच्या समर्थनार्थ मैदानात आले आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले आहे.

‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.

मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते लागते. मात्र वयात फारसे अंतर नसल्याने दोघेही चांगले मित्र आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने गेल्याच वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबादमधून आमदारपदी निवडून आले.

 

News English Summary: After Sharad Pawar publicly slapped his grandson, Pawar’s old enemy Padmasingh Patil’s grandson has now come out in support of Perth. Former Minister Dr. Padmasingh Patil’s grandson Malhar Patil has followed Parth Pawar. Malhar has backed Parth, saying he is a born fighter.

News English Title: You are warrior birth Partha Pawars support Padmasingh Patils grandson Malhar Patil News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#ParthPawar(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x