पार्थ पवार हे थोडे अपरिपक्व असल्याचं पवारांनी म्हटलं आहे | हिंदीत नया है वह - छगन भुजबळ
मुंबई, १३ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबात कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं. “आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावलं गेलेलं नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं, समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात,” असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.
शरद पवार यांनी नातवाला जाहीर फटकारल्यानंतर पवारांचे जूने शत्रु पद्मसिंह पाटील यांचे नातू आता पार्थच्या समर्थनार्थ मैदानात आले आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले आहे.
‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.
News English Summary: Sharad Pawar on Wednesday slammed Parth Pawar for being immature and not paying much attention to his statement. Meanwhile, NCP leader Chhagan Bhujbal, while reacting to Sharad Pawar’s statement, made a sarcastic remark saying ‘Naya hai waha’. He made this statement while talking to the media.
News English Title: NCP Minister Chhagan Bhujbal On Sharad Pawar Parth Pawar News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News