26 September 2020 9:41 PM
अँप डाउनलोड

पवारांची तिसरी पिढी राजकारणात? पार्थ अजित पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार?

पुणे : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गज त्यांची पुढची पिढी राजकारणाच्या आखाड्यात उतरविण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक हे सर्वश्रुत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे याआधीच सक्रिय राजकारणात आहेत, तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या म्हणजे राजकीय आखाड्यात उतरू शकतात. सध्या मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि सेनेचे श्रीरंग बारणे या मतदार संघाचे खासदार आहेत.

मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना १ लाख ८२ हजार २९३ मत पडली होती आणि ते तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते तर शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२३ इतकी मत पडली होती. परंतु त्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती आणि त्याचा थेट फायदा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला झाला होता. परंतु जर यावेळी स्वतः अजित पवारांचे चिरंजीव उमेदवार असले तर राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब सर्व शक्ती पणाला लावेल, त्यामुळे शिवसेनेचा मार्ग कठीण होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार या आधीच जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आले आहेत, त्याचा फायदा सुद्धा पार्थ पवार याना होऊ शकतो.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(119)#NCP(302)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x