20 May 2022 9:36 AM
अँप डाउनलोड

बोलायला मुद्दे नाहीत म्हणून जातीचे कार्ड खेळताय मोदी : अजित पवार

Ajit Pawar, Narendra Modi

बारामती : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितले. यावर अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीचे कार्ड खेळताय आशी टीका एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केली आहे. आयोजीत प्रचार सभेत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून वारंवार मोदींना लक्ष्य केले आहे. याचा संबध नरेंद्र मोदी यांनी थेट जातीशी लावत निवडणुकीत एकदा जातीचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कॉंग्रेसने नेहमीच माझ्यावर टीका केली आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मला अशी टीका सतत सहन करावी लागते. काँग्रेसने मला अनेकदा माझी जातीवरून शिव्या दिल्या आहेत,’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत काँग्रेसवर टीका केली. यावर उत्तर देत, ‘नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत, असा घणाघात अजित पवार यांनी केला.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(184)#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x