नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षासाठी एकमेंकावर टीका करने चालू आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगवर वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यावर टि्वटरने कारवाई करत योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त टि्वट वेबसाईटवरून कायमस्वरूपी हटवले आहे. यासोबतच इतर नेत्यांचेही ३४ टि्वट हटवले आहेत.

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा संपला आसून दुसऱ्या टप्प्याची धामधुम सुरु आहे. नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आसून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रचार सभेत मुस्लीम लीगवर वादग्रस्त टीका केली होती. ‘मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल’, असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते. टि्वटरने वेबसाईवटवरून हे टि्वट हटवले आहे. तसेच टि्वटरने गिरीराज सिंह, एम. एल. मंजिंदर सिंग सिरसा, अभिनेत्री कोयना यांचे वादग्रस्त टि्वट देखील हटवले आहेत.

काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी ‘अली’वर विश्वास असेल तर भारतीय जनता पक्षाचा ‘बजरंग बली’ वर विश्वास आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ७२ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. त्यामुळे सध्या ते प्रचार सभा घेऊ शकत नाहीत.

टि्वटरने योगी आदित्यनाथ यांचे ‘ते’ वादग्रस्त टि्वट हटवले