नवी दिल्ली : देशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त ४९ प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत संताप व्यक्त केला होता. मात्र आता या ४९ प्रतिभावंतांना ६१ प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.

देशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या मुद्द्यावरुन दिग्गजांमध्ये पुन्हा एकदा दोन गट पडले आहेत. गुरुवारी (२३ जुलै २०१९) ४९ दिग्गजांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मॉब लिंचिंगविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आज कंगणा रणावत, मधूर भांडारकर, प्रसून जोशी यांच्यासह तब्बल ६१ कलाकारांनी खुलं पत्र मॉब लिंचिंगचं मर्यादित आणि खोटं चित्र उभं केल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामाबद्दल पाठिंबा दिला.

या पत्रातून विचारणा करण्यात आली आहे की, जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक शांत का राहतात ? पुढे लिहिलं आहे की, जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते ? यासोबतच जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. जेव्हा देशाचे तुकडे होतील अशी घोषणा देण्यात आली तेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं का ना मांडलं अशी विचारणा पत्रात करण्यात आली आहे.

कंगनासह ६१ सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, त्या ४९ जणांच्या पत्राला उत्तर