26 May 2022 10:22 PM
अँप डाउनलोड

नाशिक ते मुंबई किसान सभेचा विराट मोर्चा, सरकारच्या निषेधार्थ

नाशिक : भाजप – शिवसेना सरकारने दिलेले कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई किसान सभेने सरकारविरोधात विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.

किसान सभेच्या नैत्रुत्वात नाशिक ते मुंबई असा विराट किसान मोर्चाचा लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. सध्या महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये सुरु आहे. त्यामुळे विराट किसान मोर्चा १२ तारखेला विधिमंडळावर धडक देणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विराट किसान मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत.

आधीच अपुरा पाऊस नंतर गारपीट आणि अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्यात सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली फसवी धोरणे आणि फसवी कर्जमाफी त्यामुळेच भाजप – शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी आणि विविध मागण्या मान्यकरून घेण्यासाठी हा विराट किसान मोर्चा मुंबई मध्ये विधिमंडळावर लवकरच धडक देणार आहे. खरंतर भाजप – शिवसेना सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे त्यामुळेच बळीराजाने या विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.

किसान मोर्चा ‘विराट’ धडक !

काय आहेत किसान सभेच्या मागण्या ?

१. वन अधिकार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे
२. शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती
३. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव मान्य करावा
४. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी
५. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून संपूर्ण महाराष्ट्रातील शेती समृद्ध करावी

हॅशटॅग्स

#Kissan Morcha(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x