15 December 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

त्यांच्याकडून अभ्यास सुरु आहे | बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी PhD करत असावेत

Bhagat Singh koshyari, MP Sanjay Raut, phd

मुंबई, २५ मार्च: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज (२५ मार्च) राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल कोश्यारी आजपासून २८ मार्चपर्यंत देहरादून येथे असणार आहेत. दरम्यान, राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. ते २८ मार्चला मुंबईत परततील असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यामुळे विरोधकांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट होऊ शकणार नाही.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारने सुचविलेल्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून आम्ही अभ्यास करतोय, असे सांगितले जात आहे. बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी पीएचडी करत असावेत. तसेच 12 आमदारांची नावं किती जास्त काळ मांडीखाली दाबून ठेवता येतील, याचा विक्रम राज्यपालांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा असेल, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

तसेच वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,” असं खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट अशी सरकारविरोधातील 100 प्रकरणे सादर केली. यावरुनही संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

 

News English Summary: The governor has not yet decided on the 12 MLAs suggested by the Mahavikasaghadi government. It is being said that we are studying from them. Most likely he is doing a PhD on the appointment of 12 MLAs.

News English Title: Most likely governor Bhagat Singh koshyari is doing a PhD on the appointment of 12 MLAs said MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x