28 June 2022 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा
x

आशा सेविकांच्या मासिक मोबदल्यासंदर्भात अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

MNS Leader Amit Thackeray, Ajit Pawar, Asha Workers

मुंबई, २२ जून : ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.

या पत्रात अमित ठाकरे म्हणाले की, ”परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला 4000 ते 10000 रुपये इतका मोबदला मिळत आहे.’

‘आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.

त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून द्यावा’, अशी मागणी अमित ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

काय आहे अमित ठाकरेंची सविस्तर फेसबूक पोस्टम?
परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.

 

News English Summary: MNS leader Amit Thackeray has written to Deputy Chief Minister Ajit Pawar and Health Minister Rajesh Tope. Amit Thackeray has informed about this letter on Facebook. Amit Thackeray will also meet Governor Bhagat Singh Koshyari this afternoon to demand an increase in the monthly remuneration of Asha volunteers.

News English Title: MNS Amit Thackeray Writes Letter To Ajit Pawar And Rajesh Tope On Asha Worker Pay News latest Updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x