15 December 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक टॉयलेट डे | अमृता फडणवीसांच्या विचित्र 'राजकीय' शुभेच्छा

Amruta Fadnavis, International Men's day, World Toilet day, Sanjay Raut

मुंबई, १९ नोव्हेंबर: दोनच दिवसांपूर्वी “तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली होती. मात्र विषयाचा द्वेष न करता नेटकऱ्यांनी त्यांच्या गायकीवरून आपली तीव्र नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांना समाज माध्यमांवर लक्ष केलं होतं. त्या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील होते. दुसऱ्या बाजूला नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांच्या एकूण गायकीवर डिसलाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

तत्पूर्वी, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी कंगना रानौतने शिवसेनेला लक्ष केल्याने संतापलेल्या खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका करताना थेट हरामखोर असा शब्द वापरल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, त्यानंतर केलेल्या सारवासारव दरम्यान त्यांनी हरामखोरच अर्थ ‘नॉटी’ असं म्हटलं होतं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यांचं नाव न घेता, ‘वाटत होता त्यापेक्षा जास्तच नॉटी आहात असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती.

मात्र अमृता फडणवीस यांचा देखील ट्विट करताना तोल सुटत असल्याचं दिसत आहे. अगदी एखाद्या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिनी शुभेच्छा देताना देखील त्यांनी त्याच भान राखलेलं नाही असंच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक टॉयलेट डे’च्या निमित्ताने शुभेच्छा देताना देखील त्यांनी ‘नॉटी’ शब्द वापरून विचित्र राजकरण केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२० आणि जागतिक टॉयलेट डे २०२०’च्या निमित्ताने सर्व देशभक्त पुरुषांना, एक सामान्य महिला म्हणून विनंती करते की तुम्ही सर्व एकत्र येऊन चुकिचे विचार करण्याऱ्या काही ठराविक ‘नॉटी’ पुरुषांच्या आचार विचारांचा कचरा स्वच्छ करून महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यास मदत करा.’

 

News English Summary: Amrita Fadnavis also seems to be losing her balance while tweeting. It goes without saying that even when wishing on a global and international day, they do not have the same awareness. Even when wishing on the occasion of International Men’s Day and World Toilet Day, he is seen using the word ‘naughty’ to do strange politics.

News English Title: Amruta Fadnavis political wishes  on International Mens day and World Toilet day news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x