27 May 2022 5:36 AM
अँप डाउनलोड

भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड 'पावन' झाले का? सुप्रिया सुळे

मुंबई : मानवी तस्करीचे आरोप असून सुद्धा केवळ भाजपमध्ये असल्याने विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड पावन झाले का? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

प्रसाद लाड हे सध्या भाजपचे विधानसभेचे आमदार असून त्याच्या मालकीची क्रिस्टल कंपनी सध्या मानवी तस्करीचे आरोप असून त्याची जोरदार राजकीय चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रसाद लाड यांचावर ट्विट करून निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पारदर्शक कारभाराबद्दल प्रश्न विचारले आहेत. मानवी तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या प्रसाद यांच्यावर कारवाई होत नाही कारण ते भाजपचे आमदार आहेत असा अप्रत्यक्ष आरोप करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधांना ट्विट करत प्रश्न विचारले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रसाद लाड यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की,’ शरद पवार साहेब मला नेहमी सांगायचे की आरोप झाले म्हणजे माणूस मोठा होतो’. परंतु सुप्रिया ताईंनी असं ट्विट केल्यामुळे आता माझा राजकीय भाव वाढला असून राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे असं ते म्हणाले.

तसेच प्रतिउत्तर देताना प्रसाद लाड पुढे म्हणाले की ‘मी राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून बिझनेसमध्ये होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करणं अपेक्षित होतं.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(424)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x