18 September 2021 9:58 PM
अँप डाउनलोड

'रेव्यानी' स्वतः देवाघरी गेली, पण ५ चिमुरड्यांना जीवदान देऊन गेली

गोंदिया : मामाकडे सुट्टी निमित्त आलेल्या ‘रेव्यानी’ या चिमुरडीचं अपघातात गंभीर जखमी जखमी झाली होती. तब्बल ८ दिवस रेव्यानी ब्रेन डेड झाल्याने ती उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी ती ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रेव्यानी सुट्टी निमित्त मामाकडे आली असताना मामासोबत बाईकवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला. उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी ती ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं. ब्रेन डेड झाल्याने रेव्यानीच्या पालकांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला. रेव्यानीचे वडील पोलिस दलात नोकरीला असून तिची आई गृहिणी आहे.

देवाघरी गेलेल्या मुलीचं दुःख बाजूला सारून तिच्या पालकांनी रेव्यानीचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. रेव्यानीच्या आई वडिलांच्या या निर्णयाने ५ लहानग्यांना जीवदान मिळालं आहे. रेव्यानीच हृदय मुंबईतील २ वर्षांच्या मुलीला दान करण्यात आलं असून किडनी चेन्नईच्या एका लहान मुलीला दान करण्यात आलं आहे. तर रेव्यानीच यकृत व डोळे नागपुरातील २ लहानग्यांना दान करण्यात आले.

‘रेव्यानी’ स्वतः देवाघरी गेली, पण ५ चिमुरड्यांना जीवदान देऊन गेली. तिच्या दिलदार आणि सुज्ञ पालकांच्या निर्णयाने रेव्यानी मृत्यूनंतरही अवयवांच्या रुपाने या जगात आपल्या सर्वांसोबत असेल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x