13 December 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

नांदेड हल्ला प्रकरण | 400 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल | कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक

Nanded mob attacked, Superintendent Police, Sword

नांदेड, ३० मार्च: होळीच्या मिरवणुकीवरुन नांदेडमध्ये जमावाने थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

नांदेडमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे, त्यामुळे होळीची पारंपारिक मिरवणूक काढू नये असे सर्वांच्या संमतीने ठरले होते, मात्र तरीही सांयकाळी काही युवकांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून ही मिरवणूक काढली. या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. त्यात चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यासोबतच पोलिसांच्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावेळी चित्रीकरण करणारे अनेक मोबाईलदेखील समाज कंटकांनी फोडून टाकले आहेत. पोलीस आता या समाजकंटकाचा शोध घेत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितलंय.

नांदेडमधील होला-मोहल्ला मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात 400 हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 लोकांना अटकही करण्यात आली आहे. या हल्ल्यात 4 पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

होला-मोहल्ला मिरवणूक रोखण्यासाठी पोलिस गेले होते तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दंड्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. समाजकंटकांनी एसपी आणि डीएसपीच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या.

 

News English Summary: During the Holi procession in Nanded, the mob directly attacked the Superintendent of Police with a sword. However, SP Pramod Shewale was attacked by his bodyguard Dinesh Pandey. Dinesh Pandey was critically injured in the attack and underwent surgery last night.

News English Title: Nanded mob directly attacked the Superintendent of Police with a sword news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x