15 August 2022 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

भारतात झालेल्या कोरोना लसीकरणापेक्षा अधिक लसी मोदी सरकारने निर्यात केल्या आहेत हे...

Minister Jitendra Awhad, Modi govt, Exporting corona vaccine

मुंबई, ३० मार्च: देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.

एका बाजूला देशात 1,61,275 पेक्षा अधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. भारतातील लोकांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्यायचं सोडून मोदी सरकारने केलेल्या कृत्याने अनेकांनी संताप करण्यास सुरुवात केली आहे. कारण मोदी सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रात देण्यात आलेल्या माहितीमुळे मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होतं आहे.

केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या दाव्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. कारण भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या कोरोनाच्या लसींची डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं स्वतः मोदी सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं होतं. लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य देत त्यांचं लसीकरण सरकारने केलं असतं तर सध्या देशात दिसणारी करोनाची दुसरी लाट थांबवता आली असती. पण मोदी सरकारने तब्बल ७० देशात लस निर्यात केली असून त्यात भारतीयांना दुय्यम स्थान म्हणजे भारतातील लोकांपेक्षा जगभरात अधिक लस पुरविण्यात आली आहे. या वृत्तामुळे मोदींना आंतरराष्ट्रीय नेते होण्याची घाई झाली आहे का असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित होऊ लागला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी नागराज नायडू यांनी त्यासंदर्भात थेट संयुक्त राष्ट्रात माहिती दिली होती.

दरम्यान, याच विषयाला नुसरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर ट्विटवरून टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “भारतात आजपर्यंत कोरोनाचं जितकं लसीकरण झालंय, त्याच्या काही पटीनी जास्त लसी केंद्र सरकारने निर्यात केल्या आहेत हे सर्वांना माहीत हवं.”

 

News English Summary: Following this issue, Housing Minister Jitendra Awhad has released a tweet criticising the Modi government. Jitendra Awhad tweeted, “Everyone should know that the central government has exported several times more vaccines than the corona vaccine that has been given to India till date, said minister Jitendra Awhad.

News English Title: Minister Jitendra Awhad slams Modi govt over exporting corona vaccine in foreign countries news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x