30 April 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Lok Sabha Election 2024 | 'वन अगेन्स्ट वन' फॉर्म्युला तयार, विरोधक लोकसभेच्या जागा 450 लढवणार, पाटण्यात निश्चित होणार?

Loksabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत एक विरुद्ध एक, जातीय जनगणनेवर एकमत, केंद्रीय यंत्रणांविरोधात आंदोलन, हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण आणि एकत्रित विरोध या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही बैठक १२ जून रोजी होणार होती. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी देशाबाहेर असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी राहुल ब्रिटनच्या प्रदीर्घ दौऱ्यावर होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावतीने आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पाटण्यातील बैठकीला उपस्थित आहेत. जेडीयू आणि आरजेडी या बैठकीचे प्रमुख आयोजक आहेत.

जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केसी त्यागी म्हणाले, “मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘वन अगेन्स्ट वन’ फॉर्म्युला आणला आहे. विरोधकांची मते एकत्र करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे दिसते. पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल सारखी काही राज्ये वगळता विरोधकांसाठी हा फॉर्म्युला कामी येणार आहे. अशा परिस्थितीत समविचारी विरोधी पक्षांची मते मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे ही बैठक आहे अशी त्यांनी माहिती दिली.

प्रादेशिक पक्षांकडे अधिक मुद्दे

जेडीयू आणि राजदच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी लोकसभेच्या 450 जागांवर द्विध्रुवीय लढाईचा प्रस्ताव तयार केला आहे. याला ‘वन अगेन्स्ट वन’ फॉर्म्युला म्हटले जात आहे. जातीय आधारावर ध्रुवीकरण, सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांची मनमानी आणि जातीनिहाय जनगणनेची गरज यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले की, प्रादेशिक पक्षांना बैठकीत आणखी काही मुद्दे उपस्थित करायचे आहेत आणि एकमेकांचं म्हणणं एकूण त्यावर एकमत करायचं आहे. विरोधक सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करून राहणार आहेत.

विरोधी पक्षांमधील शाब्दिक युद्ध हाही एक मुद्दा

राजद नेत्यांनी म्हटले, आम्ही होमवर्क केला आहे. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचेही यावर एकमत आहे. मात्र, आता अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे असल्याने आम्हाला काँग्रेसशी तडजोड करावी लागणार आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपचा थेट सामना असणार आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये काँग्रेस अत्यंत मजबूत स्थितीत आहे.

एकीकडे, विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केल्याने तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि ‘आप’मध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजद नेते म्हणाले की, “एकजूट दाखवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकमेकांवर हल्ले करणे थांबवावे लागेल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सार्वत्रिक निवडणूक ही राज्यांमध्ये जिंकण्यासाठी नाही, तर भाजपला पराभूत करण्यासाठी चांगले संख्याबळ मिळवण्यासाठी आहे.

News Title : Lok Sabha Election 2024 oppositions unity check details on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x