12 August 2020 2:17 PM
अँप डाउनलोड

पवारसाहेबांसाठी काहीही! भिडली पोरगी भाजपाला अन ऑपरेशन लोटसच्या पाकळ्याच गळाल्या

Operation Lotus, Maharashtra Govt Formation, Sharad Pawar, NCP

मुंबई: महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला सकाळी राजकीय भूकंप झाला आणि राज्याने सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा बातमी बघितली. मात्र त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या खऱ्या एकीची कसोटी होती. विशेष म्हणजे यावेळीच खऱ्या अर्थाने शिवसेना, राष्टवादी आणि काँग्रेस एकमेकांसोबत विश्वासाने एकत्र आल्याचे पायाला मिळाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पण सर्वात मोठं विघ्न पुढे सुरु झाली, कारण एक एक आमदार महत्वाचा झालेला असताना राष्ट्रवादीतील काही अजित पवार समर्थक आमदार रातोरात गायब झाले होते. त्यात देखील अनेकांचे फोन बंद असल्याकारणाने संपर्क करून घेण्याचा मार्ग देखील बंद झाला होता. भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन सुरु झाल्याने अत्यंत कमी वेळेत सर्व आमदारांना स्वगृही घेऊन येण्याचं मोठं आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होतं. कारण, देवेंद्र फडणवीस नाममात्र होते, पण पवारांच्या कारकिर्दीला खरं आव्हान दिलं ते मोदी आणि शहांच्या हुकूमशाही राजकीय पद्धतीने आणि नेमकं तिथेच पवार काय आहेत हे देशाला सांगितलं जाणार होतं आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा इतिहास रचला जाणार होता.

यावेळी राज्यासोबत पवारांनी त्यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यकर्त्यांशी फौज देखील मदतीला घेतली. त्याची सुरुवात तेव्हा झाली ज्यावेळी पवारांच्या मोबाईलवर अपहरण झालेल्या एका आमदाराने मेसेज केला आणि त्या आमदारांना नेमकं ठेवण्यात आलेलं ठिकाण समजलं. यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील दोन युवा कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाची जवाबदारी दिली आणि ऑपरेशन लोटसच्या पाकळ्याच गळून पडल्या. शरद पवारांना मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये त्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं.

त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी अध्यक्षा सोनिया दुहन यांच्याकडे भाजपचा खेळ संपविण्याची जवाबदारी सोपवली. केवळ भारतीय जनता पक्षाचं “प्लान ए” आणि प्लान बी” असा बातम्या काही माध्यमांच्या मार्फत पेरून आम्ही खूप चलाख आहोत अशी पेरणी करून समोरच्या पक्षाला मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याची रणनीती आखातात, मात्र भाजपाला वाकड्यात जाऊन धारेवर धरण्याची रणनीती आखल्यास यांच्यासारखे पळकुटे कार्यकर्ते कोणत्याच पक्षात नसावे हे वास्तव अनेकांना माहित नाही. आजच्या घडीला राज्यात आक्रमक होतं संपूर्ण शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यास भाजपचे कार्यकर्ते शाखांचे दरवाजे देखील उघडणार नाहीत हे वास्तव आहे.

नेमका गरजेचं असलेला तोच आक्रमक पणा धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांच्याटीमने दाखवला आणि शब्दांच्या खेळात मोठं काहीतरी असल्याचं भासवलेलं ऑपरेशन लोटस फेल केलं. धीरज शर्मा मुळचे ग्रुरुग्रामचे तर सोनिया दुहन या हरियाणा राज्यातील आहेत. या दोघांनाही पवारांकडून आदेश आणि माहिती मिळाल्यानंतर काही विश्वासू कार्यकर्त्यांकडून त्यांनी आमदारांना नेमकं कोणत्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे याची सविस्तर माहिती मिळविली. त्यानंतर गुरुग्रामच्या हॉटेल ओबेरॉयमध्ये ५ व्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये यांना ठेवण्यात आल्याचं कळलं.

त्यानंतर धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांनी काही मोजक्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांसोबत संबंधित हॉटेलमध्ये पोहचले त्यावेळी भाजपने जवळपास १५० लोकं ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र चौहान देखील असल्याचं त्यांना समजलं. यावेळी धीरज आणि सोनिया यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पाडत दोन योजना आखल्या आणि अंमलबजावणी सुरु झाली. त्यासाठी काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे जवळपास २०-२५ कार्यकर्ते हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते आणि ते हॉटेलमधील विश्वासू खबऱ्यांकडून माहिती गोळा करत होते. १५० लोकांच्या गराड्यातून राष्ट्रवादीच्या ४ आमदारांना बाहेर काढणं आव्हानात्मक होतं. त्यात देखील स्थानिक पोलीस अधिकारी मदतीला असल्याने मोठं ४ आमदारांना बाहेर काढणं आव्हानात्मक काम होतं.

मात्र रात्रीच्या ९.३० च्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जेवण करण्यास निघून गेले आणि नजर ठेवून असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डाव साधला आणि त्या आमदारांना हॉटेलच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढलं. हॉटेल परिसराच्या भोवती सोनिया दुहन यांनी आदेश दिल्याप्रमाणे एकूण ८ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यानंतर या आमदारांना बाहेर काढून एका गाडीत बसवून जाताना भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर या आमदारांना लगेच दुसऱ्या गाडीतून घेऊन जाण्यात आलं. तिथून निघून ते थेट शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले आणि रात्री शरद पवारांच्या घरी जेवण केल्यानंतर सोनिया दुहन आणि धीरज शर्मा यांच्या देखरेखीत या सर्व आमदारांना मुंबईत आणलं गेलं आणि तिथेच भारतीय जनता पक्षाचा खेळ खल्लास झाला.

मात्र या घडामोडीत हॉटेलमध्ये काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी जोरदार झटापटही झाल्याचं समजलं, पण आम्ही शरद पवार साहेबांसाठी काहीही करायला तयार आहोत, असं झटपट करत सोनिया दुहन यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच इंगा दाखवला आणि एका मुलीचा तो अवतार बघून भाजपचे कार्यकर्ते देखील बुचकळ्यात पडले. पण सर्व मोहीम फत्ते झाल्यानंतर जेव्हा शरद पवारांचं निवासस्थान गाठण्यात आलं तेव्हा मात्र भाजपच्या कोणीही आत जाण्याची धमक दाखवली नाही आणि भाजपचा प्लान एका लेकीने पूर्ण फेल केला होता आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा जाऊ लागलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x