22 September 2023 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Real Face of Sameer Wankhede | सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे एक षडयंत्र होतं असं समीर वानखेडेंना दाखवायचं होतं? खरा चेहरा समोर येतोय

Sushant Singh Rajput Case

Real Face of Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर 2021 एनसीबीन मुंबईतल्या एका जहाजावर छापा टाकला होता. या छाप्यात ड्रग्ज घेतल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत इतरांना अटक करण्यात आली होती. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली. एनसीबी आणि समीर वानखेडे आर्यन खानने ड्रग्स बाळगलं किंवा सेवन केल्याचा पुरावा देऊ शकले नव्हते.

कोर्टाने यावरुन समीर वानखेडेंच्या टीमवर ताशेरेही ओढले होते. यानंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप या केसमध्ये पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनीच केला. पुढच्या काही दिवसात पंच प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूमागे हृदयविकाराचं कारण दिलं गेलं. नंतर समीर वानखेडेंच्या ड्रग्स छाप्यावरच्या कारवाईवरच प्रश्न उभे राहिले.

विशेष म्हणजे सीबीआयने आता जी एफआयर दाखल केलीय, त्यात समीर वानखेडेंनी सामूहिकरित्या कट रचून शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी वसुलीचं षडयंत्र रचल्याचं म्हटलंय. शिवाय या 25 कोटीपैकी 50 लाख रुपये वानखेडे आणि इतर आरोपीना मिळाल्याचाही दावा सीबीआयने केलाय.

नवं प्रकरण समोर – 30 लाखांची रोलेक्स डेटोना घड्याळ चोरली
आता नवं प्रकरण समोर आलं आहे. एका विदेशी नागरिकाने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ब्रिटीश नागरीक करण सजनानी याने हा आरोप केला आहे. छापेमारीच्यावेळी समीर वानखेडेंनी मला अटक केली. यावेळी अधिकारी आशिष रंजन यांनी माझी 30 लाखांची रोलेक्स डेटोना घड्याळ चोरली. माझ्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामनातही ती घडी दिसली नाही, असं करण सजनानी यांनी म्हटलं आहे.

एनसीबीची एक टीम आधीच त्यांच्याविरोधात महागड्या घड्याळ्यांची खरेदी आणि विक्रीची चौकशी करत आहेत. ही घड्याळ त्यांना कशी मिळाली हे ते सांगू शकले नाहीत. तर दुसरीकडे करण सजनानी यांनी त्यांची घड्याळ छापेमारीत आशिष रंजन यांनी घेतल्याचा आरोप केला आहे. या केसचे आयओ आशिष रंजनच होते.

गांजा नसल्याचे सिद्ध झालं
पूर्ण एनसीबीच्या विरोधात माझी तक्रार नाही. मात्र काही अधिकाऱ्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे. मीडियात लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या.आमच्या प्रकरणात 200 किलो गांजा सापडला असं म्हणत आम्हाला अटक केली. मात्र कोर्टासमोर सादर केलेल्या लॅब रिपोर्टमध्ये तो गांजा नसल्याचे सिद्ध झालं. तरीही आम्हाला जास्तीचे चार महिने तुरुंगात काढावे लागले, असं सजनानी यांनी सांगितलं.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण एक षडयंत्र असं…
समीर वानखेडे यांनी मला माझ्या मूळ केसच्या व्यतिरिक्त सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये आरोपी बनायला सांगितलं होतं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांना एक षडयंत्र होतं असं दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मलाही आरोपी बनायला सांगितलं होतं, असा आरोप सजनानीने केलाय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bollywood actor Sushant Singh Rajput Case Sameer Wankhede connection check details on 18 May 2023.

हॅशटॅग्स

#Sushant Singh Rajput Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x