26 April 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Midday Meal Scheme | मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री भुजबळ

Midday Meal Scheme

नाशिक, ३० सप्टेंबर | महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा(Midday Meal Scheme) शुभारंभ झाला असून या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

The government’s ambitious ‘Midday Meal Scheme’ has been launched under which construction workers will get nutritious food, said Chhagan Bhujbal, Minister of State for Food, Civil Supplies and Consumer Protection and Guardian Minister :

नाशिकच्या उद्योग भवन, सातपूर एमआयडीसी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचे शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, इमारत व इतर बांधकाम (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1966 च्या कलम 40 व 62 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिनियमांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 2007 बनविले असून उक्त अधिनियमांच्या कलम 18 अन्वये कामगार दिनी दिनांक 1 मे 2011 रोजी “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामकामगार कल्याणकारी मंडळ” मुंबई येथे स्थापना केलेली आहे. या मंडळांतर्गत प्रत्येक जिल्ह्याकरिता कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत.

कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम सुरू करण्यासाठी शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार मंडळ यासाठी एक टक्का उपकर दिला जातो. या उपक्रमातून बांधकाम कामगारांना 28 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. सन 2011 पासून सुरू झालेल्या या मंडळाकडे आतापर्यंत 11 हजार कोटी रुपयांचा निधी शिल्लक असून या निधीच्या माध्यमातून बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

17 जिल्ह्यातील मजुरांना मिळणार लाभ:
महाराष्ट्र शासन व मंडळाने बांधकाम कामगारांना होणाऱ्या जेवणाची अडचण विचारात घेऊन बांधकाम कामगारांना कामाच्याठिकाणी “मध्यान्ह भोजन योजना’ जाहीर केली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आज होत आहे. या योजनेंतर्गत बांधकामाच्या ठिकाणावरील नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Midday Meal Scheme construction workers will get nutritious food in Maharashtra.

हॅशटॅग्स

#MiddayMealScheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x