29 November 2022 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | राज्य सरकारवर टीकास्त्र

Farmer's Death

Farmer’s Death | राज्याच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबईतील मंत्रालयासमोरच एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते.

रुग्णालयात दाखल करण्यात आले होते :
त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वा. मयत घोषित केले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Farmer’s Death set on fire in front of the Mantryala check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#Farmer's Death(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x