22 September 2023 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

इटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी करोनाची चाचणी केली का? भाजपाचा निशाणा

BJP MP Ramesh Bidhuri, Congress MP Rahul Gandhi, Corona Virus

नवी दिल्ली: इटलीहून परत आल्यावर राहुल गांधींवर यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी काल म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे.

दक्षिण दिल्लीहून भाजपचे खासदार बिधुडी यांनी, राहुल गांधींना मायदेशात परतल्यानंतर सर्वात अगोदर वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला. सध्या दिल्लीतही करोना फैलावत असल्याचं समोर येतंय. उल्लेखनीय म्हणजे, इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १०० पर्यंत पोहचलीय. ‘करोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे राहुल गांधींनी लोकांपर्यंत जाण्याअगोदर स्वत:ची वैद्यकीय चाचणी करायला हवी होती’ असं बिधुडी यांनी म्हटलं.

राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी ब्रजपुरी येथे आंदोलकांनी जाळलेल्या शाळेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “ही शाळा भारताचं भविष्य आहे, द्वेष आणि हिंसेने तिला संपवलं जात आहे. यामुळे कोणाचाच फायदा झालेला नाही. हिंसा आणि द्वेष विकासाचे शत्रु आहेत. भारताची विभागणी केली जात आहे. भारताला जाळलं जात आहे. यामुळे भारतमातेला काहीही फायदा होणार नाही. सर्वांनी मिळून प्रेमाने एकत्र काम केलं पाहिजे”.

 

News English Summery: On his return from Italy, Rahul Gandhi visited the northeastern Delhi. Since then, the BJP has targeted them. Have you tested Corona since returning from Italy? Rahul Gandhi should say this first. Need to test Corona as soon as it enters India? Do you want to spread the Corona virus in India? BJP MP Ramesh Bidhuri has said this yesterday. Rahul Gandhi has said this before visiting the violence-hit region in northeast Delhi. BJP MP from South Delhi, Bidhudi, advised Rahul Gandhi to get medical examination soon after returning home. At present, there are reports that Karuna is spreading in Delhi too. Significantly, the death toll from the Corona virus in Italy has reached 100. ‘Corona is an infectious disease. Therefore, Rahul Gandhi should have done his own medical examination before reaching the people, ‘said Bidhudi.

 

Web News Title: Story after returned from Italy Congress MP Rahul Gandhi went under Corona Virus test or not asked BJP MP Ramesh Bidhuri.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(250)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x