मोदींकडून १० एप्रिल २०१५ ला राफेल कराराची घोषणा, मग ६ महिन्यांत अंबानींच्या कंपनीला करमाफी
नवी दिल्ली : फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच दुसऱ्या बाजूला अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली.
ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची कृपा आहे व यातही मोदींनी अनिल अंबानींचे दलाल म्हणून काम केले, असा गंभीर आरोप याआधीच काँग्रेसने केला. अंबानींच्या कंपनीने ही करमाफी गैरमार्गाने मिळविल्याचा ठामपणे इन्कार केला. राफेल करार आणि अंबानी कंपनीच्या करमाफीचे प्रकरण यांच्यात सांगड घालणे केवळ चुकीचेच नाही तर भारतीय नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी केला जाणारा हा हेतुपुरस्सर खोडसाळपणा आहे, असा प्रतिटोला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने मारला. ‘रिलायन्स फ्लॅग अॅटलांटिक फ्रान्स’ ही अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची एक उपकंपनी फ्रान्समध्ये उपग्रहाव्दारे संचालित केबल नेटवर्क व अन्य प्रकारच्या टेलिकॉम सेवा देण्याचा व्यवसाय करते.
‘ल मॉन्द’च्या अधिकृत वृत्तानुसार फ्रान्समधील कर अधिकाऱ्यांनी सन २००७ ते २०१० या काळासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीवर करआकारणीचा हिशेब केला व कंपनीवर तब्बल ६० दशलक्ष युरो एवढ्या कराची आकारणी केली. परंतु रिसायन्स कंपनीने तडजोड म्हणून यापैकी केवळ ७.६ दसलक्ष युरो एवढीच रक्कम देण्याची तयारी दर्शविली. ते अमान्य करून कर विभागाने त्यापुञील सन २०१० ते २०१२ या कालावधीसाठी कंपनीकडे आधीच्या रकमेखेरीज आणखी ९१ दशलक्ष युरो कराची मागणी केली.
‘ल मॉन्द’ने पुढे असे म्हटले की, आधीचा कर चुकता न करता एप्रिल २०१५ अखेरपर्यंत एकूण कर आकारणी १५१ दशलक्ष युरोपर्यंत पोहोचली. अखेर कंपनी व करविभाग यांच्यात तडजोड झाली व कंपनीने देऊ केलेली १५१ दशलक्ष युरोऐवजी ७.३ दशलक्ष युरो एवढी रक्कम करविभागाने स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची घोषणा १० एप्रिल २०१५ रोजी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत अंबानी यांच्या कंपनीला ही करमाफी दिली गेली. या बाबतचा फ्रान्स व भारत सरकार यांच्यातील अंतिम करार २३ सप्टेंबर २०१६ रोजी झाला होता.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या प्रवक्त्याने या तडजोडीत काही गैर असल्याचा, त्यात कंपनीवर मेहेरनेजर केली गेल्याचा आणि त्याचा राफेल कराराशी काही संबंध असल्याचा ठाम इन्कार केला. प्रवक्ता म्हणाला, हे प्रकरण सुमारे १० वर्षांपूर्वीचे आहे. सन २००८ ते २०१२ या काळात रिलायन्स फ्लॅग कंपनीचा तोटा २० कोटी रुपयांचा (सुमारे २.७ दशलक्ष युरो) होता व फ्रान्सच्या कर अधिकाऱ्यांनी त्यावर १,१०० कोटी रुपये कराची मागणी केली होती. कराची ही मागणी सर्वस्वी अवास्तवर व बेकायदा होती. फ्रान्समधील प्रचलित कायद्यानुसार कंपनी व कर अधिकारी यांनी एकत्र बसून ५६ कोटी रुपये करआकारणीची तडजोड केली.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News