6 May 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Alert For Shivsena | उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी स्क्रिप्टेड वृत्त पसरवली जाणार! महत्वाची अपडेट

Alert For Shivsena

Alert For Shivsena | शुक्रवारी धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता शिंदे आणि भाजप पुढच्या रणनीतीवर काम करणार करत आहे. मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपकडे उमेदवार नसल्याने मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शिवसेनेतील लोकं फोडून स्वतःकडे आणण्यासाठी मोठा राजकीय गेम प्लॅन आखला गेल्याचं वृत्त आहे.

मुंबई महापालिकेसाठी कोणताही थर गाठणार :
शिंदे हे मुंबईत अजिबात प्रसिद्ध किंवा आवडता राजकीय चेहरा असलेले नेते नाहीत हे वास्तव आहेत. त्यामुळे येथे प्रचंड पैसा खर्च केला तरी खाली खुर्च्या पाहायला मिळतात. उलट मुंबईत सामान्य लोकं आता शिंदेंबद्दल राग व्यक्त करताना दिसत आहेत. अगदी नाक्यावरील सामान्य लोकांच्या गप्पांमध्ये शिरून आढावा घेतल्यास सुस्पष्ट जाणवतंय. परिणामी मुंबईतील निवडून आणण्याची क्षमता नसल्याने येथील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदेंपासून दुरावा करून आहेत. तसेच मुंबईत प्रत्येक वॉर्डात प्रकाश आंबेडकरांना मानणारा बहुजन वर्गातील मतदार असल्याने आणि प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत युती करणार असल्याने मुंबईतील उद्धव ठाकरेंचे शिवसेना पदाधिकारी शिंदेसोबत जाऊन राजकीय आत्महत्या करणार नाहीत.

त्यामुळे येथे ठराविक माध्यमांना हाताशी धरून संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या पुढील आठवडाभर पसरविण्याची मोठी रणनीती आखली गेल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. कारण, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू अधिक कमकुवत असल्याचं कायद्यांचे तज्ज्ञ सांगत असल्याने उद्या शिंदेंविरोधात घटना घडू शकतात, परिणामी अत्यंत कमी काळात मोठं मिशन राबवून मुंबईतील पदाधिकारी फोडण्याची रणनीती आखली गेल्याचं वृत्त आहे. त्यासाठी ठराविक नेत्यांना विशेष जवाबदारी देण्यात आली आहे. कालच्या फडणवीसांच्या प्रतिक्रियेत “कुंपणावरील लोकं” हा शब्द प्रयोग झाला, तो याच रणनीती मागील शब्द होता असं म्हटलं जातंय.

जितकं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जाईल तेवढा अधिक फायदा उद्धव ठाकरेंना होईल :
सध्या भाजप, शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष करण्याचा सपाटा लावला असला तरी त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होणार हे लोकांमध्ये संवाद केल्यावर स्पष्ट दिसतंय. भाजप आणि शिंदे गट जोश मध्ये अधिक राजकीय चुका करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. भावनिक लाट कमी करण्यासाठी निवडणुका लांबवल्या, पण राजकीय खेळीतून ती अधिक तीव्र होतं असून त्याचे परिणाम देखील भाजप आणि शिंदे गटाला भोगावे लागतील असं देखील पाहायला मिळतंय. लोकांना काहीच कळत नाही आणि मला सगळ्यातलं सगळं कळतं अशा कायम भूमिकेत दिसणारे देवेंद्र फडणवीस हेच यामागील सूत्रधार आहेत असं सामान्य लोकं बोलत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुपडा साफ करून घेणारे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मुंबईत चमत्कार करणार हा म्हणजे विनोद समजला जातोय. कारण या दोन्ही नेत्यांची आणि शिंदेची मुंबईत राजकीय नेते म्हणून सारखीच अवस्था आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Alert For Shivsena after election commission decision check details on 18 February 18 February 2023.

हॅशटॅग्स

#Alert For Shivsena(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x