12 December 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

शक्तिमान घोड्याचे क्रूरपणे पाय तोडणाऱ्या भाजप आमदारचं आता महिलांप्रति धक्कादायक विधान

Uttarakhand, BJP MLA Ganesh Joshi, Shaktiman Horse, women's

देहरादून, १८ मार्च: मार्च २०१६ मध्ये शक्तिमान घोड्याला गंभीर मारहाण करून त्याचा एक पाय जायबंदी करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना त्यावेळी पोलिसांनी अटक झाली होती. प्राण्याला क्रुरपणे मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता.

गणेश जोशी यांनी डेहराडून येथील भाजपच्या निदर्शनावेळी पोलिसांच्या घोड्याचा पाय तोडून आपल्या पाशवी वृत्तीचे दर्शन घडवले होते. येथील विधानसभेच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधी निदर्शने सुरू असताना हा प्रकार घडला होता. त्यावेळी पोलीस घोड्यावरून कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच गणेश जोशी यांनी पोलिसांच्या घोड्यावर हल्ला केला होता.

दरम्यान, त्या कृत्यानंतर आता याच भाजप आमदारांनी महिलांप्रती स्वतःचे बुरसटलेले विचार व्यक्त केले आहेत. ज्याला मुकी जनावरं समजत नाहीत त्याला महिला काय समजणार अशी टीका समाज माध्यमांवर होतं आहे. यासंदर्भात विधान करताना ते म्हणाले की, “आपल्याला आयुष्यात काय करायचंय याबद्दल महिला नेहमीच बोलत असतात….परंतु महिलांसाठी हेच महत्वाचं आहे की त्यांनी घरी राहून कुटुंब आणि मुलं सांभाळावी. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी देखील महिलांचा अपमान करणारं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं होतं.

 

News English Summary: Ganesh Joshi, BJP’s Uttarakhand minister who became famous for beating up the horse Shaktiman, says women should stay home & look after their family. His boss, the CM Rawat, sizes up and abuses women for wearing torn jeans. Calls Modi a God! This is BJP’s mindset, esp about women!.

News English Title: Uttarakhand BJP MLA Ganesh Joshi made controversial statement against women’s news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x