23 September 2021 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

ह्या वास्तुदोषामुळे घरात सतत होतात वादविवाद | जाणून घ्या तुमच्या घरात तर नाहीयेत ना ‘हे’ वास्तुदोष

 Vastu Tips to reduce husband wife quarrels at home

मुंबई, ०६ सप्टेंबर | घरात सुख, शांती आणि आनंद असावा, ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय नको असतांना घरात भांडणे सुरू होतात, ज्यामुळे घरात एक तणावपूर्ण वातावरण तयार होते आणि नात्यात दुरावा यायला सुरुवात होते. यामागे काही वास्तू दोष देखील आहेत, ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि तेच आपल्या घरावर नकारात्मक प्रभाव पाडण्याचा प्रारंभ करतात. तर चला मंग जाणून घेऊया अश्या कोणत्या कारणामुळे घरात अश्या समस्या उद्भवतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ह्या वास्तुदोषामुळे घरात सतत होतात वादविवाद, जाणून घ्या तुमच्या घरात तर नाहीयेत ना ‘हे’ वास्तुदोष – Vastu Tips to reduce husband wife quarrels at home :

1) काटेरी झाडे:
घरात काटेरी झुडूप असल्याने त्याचा वाईट परिणाम हा घरात होतो आणि कुटुंबातील लोकांवर होतो, या अश्या काटेरी झाडामुळे घरांमध्ये मोठे वादविवाद व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर तुमच्याही घरात काटेरी झाड असेल त्याला आजच घराबाहेर काढा. जेणेकरून घरात भांडणे होणार नाहीत आणि घरात सुख शांती लाभेल.

2) वाळलेली झाडे:
जेव्हा घरामध्ये एखादे झाड अचानक सुखायला लागते तेव्हा घरात वास्तू दोष निर्माण होतो. ह्या वाळणाऱ्या झाडांमुळे नात्यांवर नकारात्मक प्रभाव पडायला सुरुवात होते. आणि विनाकारण घरात वादविवाद हे सुरू होतात. त्यामुळे जर घरात कोणतेही झाड वाळायला लागले असेल तर त्याला पाणी टाकून पुन्हा जीवित करा म्हणजे त्याला हिरवागार पणा येईल.

3) नळातुन सतत पाणी टपकणे:
नळामधून सतत पाणी जर घरात टिपकट असेल तर ते घरात वास्त दोष घेऊन येते. यामुळे प्रेमातील आणि नातेसंबंधातील आपलेपणा संपायला लागतो आणि नात्यात घरात भांडणे सुरू व्हायला लागतात.

Quarrel and Vastu Shastra Help to Prevent Clashes :

4) तुटलेली काच:
तुटलेली काच घरात ठेवल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो आणि नात्यात कटुता निर्माण होते. घरात तुटलेली काच ठेवने हा एक प्रकारचा वास्तुदोषच आहे, ज्यामुळे घरात वाद आणि तणावाचे वातावरण तयार होते.

5) तुटलेली मूर्ती:
तुटलेल्या मूर्तीमुळे घरात वास्तूचे दोष उद्भवतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होते. आणि यामुळे घरात कलह उद्भवतो. त्यामुळे जर घरामध्ये तुटलेली मूर्ती असेल तर आजच त्याचे विसर्जन करा. आणि त्याजागेवर नवीन मूर्ती खरेदी करून घरात आना.

तुमच्या घरातही विनाकारण घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे व वादविवाद होत असतील तर, त्यामागे हे वरील कारणे देखील असू शकतात, म्हणून आपल्या घरात ठेवलेल्या अशा गोष्टी घरातून दूर करा आणि घराचे वातावरण चांगले बनवा.

अत्यंत महत्वाची टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Vastu Tips to reduce husband wife quarrels at home.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x