20 April 2024 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

गुगलवर अजूनही वॅक्सीन कधी येणार?, कोणता आजार कोरोना संबंधित आहे? सर्च होतंय

India, Covid 19 search engine, Google Search Corona Virus

नवी दिल्ली, ९ जून: दिवसागणिक देशातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात ९ हजार ९८७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देश अनलॉक होत असतानाच करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

देशभरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. सध्या एक लाख २९ हजार ९१७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसबाबत छोट्या राज्यांमधून जास्त गुगल सर्च करण्यात आलं आहे. यात गोवा पहिल्या क्रमाकांवर राहिला, त्यानंतर मेघालय, नंतर चंडीगढ, त्रिपुरा, नागालॅंड, जम्मू-काश्मीर, दमन-दीव, सिक्कीम, हरयाणा आणि झारखंड राहिले. गुगल ट्रेन्डनुसार यादरम्यान लोकांनी अनेक प्रश्नही सर्च केलेत. ज्यात ‘वॅक्सीन काय आहे?, ‘भारतात वॅक्सीन कधी येणार?’, ‘कोणता आजार कोरोना व्हायरससंबंधी आहे?’, ‘लक्षणांविना कोरोना व्हायरस पसरू शकतो का?’, या प्रश्नांचा समावेश होता.

कोरोना व्हायरसबाबतचा सर्च कमी झाला असून तो 12व्या स्थानावर आला आहे. तर सिनेमे, बातम्या, हवामान आणि शब्दांचे अर्थ यासंबंधी सर्च वर आलेले बघायला मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे हे विषय सामान्य दिवसांमध्येही भारतात सर्वात जास्त सर्च होतात. गुगल सर्च ट्रेड्सनुसार कोविड-19 संबंधित सर्च एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात साधारण अर्धे राहिले. पण दुसरीकडे देशात कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.

 

News English Summary: According to Google Search Trades, Covid-19 related searches in May were about half that of April. But on the other hand, cases of corona are increasing in the country.

News English Title: Indian people not searching about corona virus on google in May What they search will shock you News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x