6 May 2021 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
x

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव

Anil Deshmukh

मुंबई, ०४ मे | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (३ मे) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप केले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, उच्च न्यायालयाने परमबीर यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेले असतानाही सीबीआयने सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेणे, त्यांच्याकडे महत्त्वाची प्रकरणे सोपवणे या प्रकरणांचाही प्राथमिक माहिती अहवालात समावेश केला आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. राज्य सरकारनेही काल ही याचिका केली असून आज (४ मे) त्यावर सुनावणीची शक्यता आहे.

परमबीर यांच्या पत्राचा आधार घेत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मलबारहिल पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली नाही हे लक्षात आल्यावर उच्च न्यायालयाने आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.

त्यामुळे या आरोपांची पारदर्शी चौकशी होण्याच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आल्याचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती न्यायालयाने स्पष्ट केले होते. प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला. याविरोधात देशमुख यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली असून सीबीआयला कठोर कारवाईपासून मज्जाव करण्याची मागणी केली आहे.

 

News English Summary: Former Home Minister Anil Deshmukh has moved the High Court yesterday (May 3) seeking quashing of a case filed by the CBI against former Mumbai Police Commissioner Parambir Singh. Parambir Singh had leveled serious allegations of corruption against former Home Minister Anil Deshmukh.

News English Title: Anil Deshmukh appeal in high court to cancel FIR registered by CBI news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x