26 April 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये - पडळकर

BJP MLA Gopichand Padalkar, CM Uddhav Thackeray, Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja

मुंबई, २४ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.

“सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात बाहेरील व्यक्ती, महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये” असं गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत म्हणाले. सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबाला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान द्यावा, असा आग्रह पडळकर यांनी धरला.

तत्पूर्वी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांन कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: BJP’s Legislative Council MLA Gopichand Padalkar has demanded that Chief Minister Uddhav Thackeray should not pay homage to Ashadi Ekadashi. Padalkar suggested to pay homage to the farmer family.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar emphasis not allowing CM Uddhav Thackeray to perform Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja News latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x