23 September 2019 11:23 AM
अँप डाउनलोड

रायगड: कोकणी मतदाराने शिवसेनेच्या अनंत गितेंना नाकारलं; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी

Sunil tatkare, Anant Gite, Shivsena, NCP, Loksabha Election 2019

रायगड : शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना यंदाची लोकसभा काहीशी अवघड असल्याचं आधीच म्हटलं जात होतं. त्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अनंत गीतेनी या मतदारसंघाकडे काहीस दुलक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकांना अनेकवेळा केला होता आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध रोष पाहायला मिळत होता.

त्यात स्वतः उद्धव ठाकरे यांनी २ मतदारसंघ मिळून एकत्रित सभा घेतल्याने सर्वच कठीण होऊन बसल्याचे पाहायला मिळाले. तसेच स्थानिक श्रोत्यांपेक्षा बाहेरील लोकं भाडयाने आणून गर्दी दाखवल्याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आल्याने शिवसेनेसाठी मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक पातळीवर सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि मनसेची साथ मिळाल्याने त्यांचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जात आहे.

याच मतदारसंघात येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली ज्याला स्थानिकांचा मोठा प्रस्तिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना झाला. सुनील तटकरे यांना एकूण हजाराच्या फरकाने मतं घेत शिवसेनेचे अंनत गिते यांचा रायगड लोकसभा मतदार संघात पराभव केला आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#NCP(167)#Shivsena(571)#SunilTatkare(3)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या