2 May 2024 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच

Union Minister Piyush Goyal, Shivsena

नवी दिल्ली: भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या २८८ पैकी १६४ जागा जिंकलो. भारतीय जनता पक्षानं १०५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्ही ६५-७० टक्के मतं मिळवून विधानसभेत पोहोचलो. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षालाच विजय मिळालेला आहे, इतर तिन्ही पक्षांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंतांसाठी मी गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता, दक्षिण मुंबईतली जनता शिवसेनेला मतं देऊ इच्छित नव्हती. आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की, हे लोक गद्दारी करतील. शिवसेनेनं आपल्या सिद्धांतांशी फारकत घेत महाराष्ट्रात सरकार बनवलं. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात, असंही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केलं आहे.

प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो असं सांगणारे पियुष गोयल यांच्या कुटुंबातील सदस्यांवर असेच आरोप झाले होते. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल वादात अडकले होते. कारण २००५-०६ मध्ये केवळ १ लाखात कंपनी सुरु केलेली कंपनी जी सध्या त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांच्या मालकीच्या होत्या त्या कंपनीच्या नफ्यात तब्बल ३००० पट वाढ झाली होती. त्यांच्या पत्नीच्या मालकीची कंपनी इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या पुढील अडचणी वाढल्या होत्या. काँग्रेसने थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले होते.

अजब दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांमध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर घेतले होते. त्याला कारण होतं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते. आइन्स्टाइन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असं गोयल यांनी सांगितलं होतं.

गोयल यांच्या या वक्तव्यावर सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही जोरदार टीका केली होती. ‘अर्थव्यवस्थेच्या गणिताची जाणीव होण्यासाठी सरकारने डोक्यावर सफरचंद पडण्याची वाट पाहू नये. हे सांगण्यासाठी आम्हाला आइन्स्टाइनचीही (न्यूटनची माफी मागून) गरज नाही. भविष्यातील स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत केलं तर बरं होईल,’ असा टोला येचुरी यांनी लगावला होता.

 

Local Parties are Responsible for Corruption in States says Union Minister Piyush Goyal

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x