11 July 2020 2:32 PM
अँप डाउनलोड

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या पत्नीच्या कंपनी नफ्यात ३००० पट वाढ ?

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल सध्या वादात येण्याची शक्यता आहे. कारण २००५-०६ मध्ये केवळ १ लाखात कंपनी सुरु केलेली कंपनी जी सध्या त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांच्या मालकीची असून त्यांच्या कंपनी नफ्यात तब्बल ३००० पट वाढ झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यांच्या पत्नीच्या मालकीची कंपनी इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

२००६ साली अवघे १ लाख रुपये गुंतवून १० वर्षात कंपनीचा नफा तब्बल तीस कोटी म्हणजे ३००० पटीने वाढली आहे. त्यातही महत्वाच म्हणजे कंपनीने हे उत्पन्न नक्की कशातून मिळाले याची माहिती देण्यात आलेली नाही असा दावा सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच बँकेचे जवळपास ६५० कोटी रुपये थकवणारे शिर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या राकेश अग्रवाल आणि मुकेश बन्सल यांच्याशी सुद्धा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे घनिष्ट संबंध असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यावर आणि केंद्रात मंत्रिपदी संधी मिळताच त्यांनी कंपनीचा राजीनामा देऊन त्यांचे सर्व शेअर्स पत्नीच्या नावावर केले होते असा काँग्रेसचे स्पष्टं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1245)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x