29 April 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Dasara Melava 2022 | शिंदे गटाने गर्दी दाखवण्यासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये देताना जवळपास 52 कोटी रुपये खर्च केलेत

Dasara Melava 2022

Dasara Melava 2022 | शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेत राहिला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. मात्र स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांनी थेट शिवसेनेला संपवू पाहणाऱ्या भाजपाला साथ दिल्याने राज्यात सुप्त संतापाची लाट आहे.

शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. पहिला मेळावा आहे तो अर्थातच शिवाजी पार्क या मैदानावर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आणि दुसरा आहे तो बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मात्र शिंदे गट गर्दी दाखवण्यासाठी कसा पैसा खर्च करत आहे आणि शिंदे यांना ओळखतही नसलेल्या लोकांना गाव-खेडयातून आणलं जातंय. त्याचे व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. कालच केवळ एसटी बुकिंगसाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी एसटी महामंडळाला दिल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळे शिंदे गटाच्या गर्दीचं वास्तव एकदिवस आधीच राज्यातील लोकांसमोर आलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शिंदे गटाचे आमदार देत असून त्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला, याचा आकडाही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितला. त्यांच्या मेळाव्यावा 3 लाख येऊ दे, नाहीतर 5 लाख येऊ दे.. ते पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. उद्धव ठाकरे या सगळ्यांचा समाचार घेतील. लोकांची श्रद्धा बाळासाहेबांवर आणि त्यांच्या चिरंजीवावर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dasara Melava 2022 serious allegations on Shinde camp check details 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Dasara Melava 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x