26 April 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

राज्य सरकार शिंदे पिता-पुत्राची प्रॉपर्टी?, मुख्यमंत्री दौऱ्यावर असले की खासदार पुत्र श्रीकांत शिंदे सुपर सीएम असतात?

MP Shrikant Shinde

MP Shrikant Shinde ​​| राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेला एक फोटो चर्चेत आहे. या फोटोनंतर राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदेंचं सुपर सीएम झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

फोटो ट्विट केला :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. रविकांत वरपे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हा फोटा अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. असं दिसतं आहे. यावरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या कारभार देवेंद्र फडणवीस सांभाळत असून, तेच सर्व निर्णय घेत असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे.

राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज :
राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Why NCP called MP Shrikant Shinde as super CM check details 23 September 2022.

हॅशटॅग्स

#MP Shrikant Shinde(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x