
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजार इतर देशातील शेअर बाजाराच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. जगातील सर्व देशात शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव दिसून येत आहे. वैश्विक अस्थिरता आपल्या चरम सीमेवर पोहोचली आहे. महागाई चा भडका उडाला आहे, बेरोजगारी वाढली आहे, पाश्चिमात्य देशांचे युद्ध आणि राजकारण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीतही अस्थिरता दिसून येत आहे. मागणी आणि पुरवठा यामधील चढ उतार आणि अमेरिकेने काही देशांवर लावलेले आर्थिक प्रतिबंध या मुळे विकसनशील देशांची आर्थिक बाजू कमजोर होताना दिसत आहे. पण ह्या अस्थिर्तेतून भारतीय शेअर बाजार अजिबात डगमगला नाही. थोडीफार पडझड झाली होती, पण आता आपला स्टॉक मार्केट पुन्हा तेजीत येऊ लागला आहे.
शेअर बाजारात अनेक असे स्टॉक आहेत ज्यांनी पडझडीच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना चांगलं परतावा मिळवून दिला आहे. लोकांनी स्टॉकमध्ये चांगली वाढ झाल्यावर विकून प्रॉफिटही बुक केले आहेत. असेच एका दिग्गज आणि प्रसिद्ध गुंतवणूकदाराने त्यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक विकून प्रॉफिट बुक केला आहे. त्यांचे नाव आहे, शंकर शर्मा. प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी आपल्या पोर्टफोलओ मधील ” ईशान डाईज आणि केमिकल्स” हा स्टॉक विकून प्रॉफिट बुक केला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या स्टॉक डीलच्या डेटानुसार, शंकर शर्मा यांनी “इशान डायज अँड केमिकल्स” कंपनीचे 4,14,254 शेअर्स 74.15 रुपये प्रति शेअर या किमतीवर विकुन नफा कमावला आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी इशान डायज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 72.45 रुपये वर ट्रेड करत होते.
शंकर शर्मा यांच्याकडे 5 लाखांहून अधिक शेअर्स :
एप्रिल-जून 2022 या तिमाहीत इशान डायस अँड केमिकल्सच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, शंकर शर्मा यांच्याकडे कंपनीचे 5,49,000 शेअर्स म्हणजेच 2.97 टक्के वाटा होता. शंकर शर्मा यांनी नुकताच 414254 शेअर्स विकुन नफा कमावला आहे. याचा अर्थ सध्या शंकर शर्मा यांच्याकडे आता फक्त 1,34,746 शेअर्स म्हणजे अंदाजे 0.73 टक्के वाटा उरला आहे. या परिस्थितीत, जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या शेअरहोल्डिंग यादीमध्ये वैयक्तिक भागधारकांच्या यादीत शंकर शर्मा यांचे नाव दिसणार नाही.
1 लाखावर 11 लाख रुपयांची कमाई :
8 मे 2015 रोजी “ईशान डायज अँड केमिकल्स”चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 6.62 रुपये किमतीला सूचीबद्ध झाले होते. 22 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 72.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 8 मे 2015 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 11 लाख रुपये झाले असते. इशान डाईज अँड केमिकल्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 177 रुपये आहे. वर आहेत.त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 70.25 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.