ठाकरे सरकारकडून चिनी कंपन्यांसोबतच्या ३ मोठ्या करारांना स्थगिती...रद्द नाही

मुंबई, २२ जून : राज्यातील महाविकास आघाडीने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या करारांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (दोन) या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेपूर्वीच या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यापुढे चीनच्या कंपन्यांसोबत कोणतेही करार करू नये, असा सल्ला दिला होता, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
मागील सोमवारी (१५ जून रोजी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला चीनचे भारतीय दूत सन विडोंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर ३ हजार ७७० कोटींचा करार झाला. या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगावमध्ये वाहननिर्मिती कारखाना उभारणार होती. महाराष्ट्र सरकार आणि चिनी कंपन्यांदरम्यान झालेल्या तीन करारांपैकी हा सर्वात मोठा करार होता. त्याच प्रमाणे पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीच्या सोबतीने एक हजार कोटींचा कारखाना सुरु करण्यासंदर्भात करार केल्याचे सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. या करारामधून दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे म्हटलं होतं.
या प्रकल्पांमध्ये पहिला प्रकल्प ग्रेट वॉल मोटर्सचा होता. दुसरा प्रकल्प पीएमआई इलेक्ट्रो मोबिलिटी आणि फोटोन (चायना) यांचा होता. या १ हजार कोटींची गुंतवणूक करणार होत्या. तर तिसरा प्रकल्प हिंगली इंजिनियरिंगचा होता. यामध्ये 250 कोटींची गुंतवणूक केली जाणार होती. याचबरोबर केंद्र सरकारने चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांची यादी मागविली आहे. याद्वारे चीनमधून येणारे कमी दर्जाचे समान रोखण्यात येणार असून देशामध्ये चांगल्या दर्जाचे सामान निर्माण केले जाणार आहे.
News English Summary: The Maha Vikas Aghadi government has blocked three agreements with Chinese companies signed in Magnetic Maharashtra 2.0. According to the agreement, Chinese companies were to invest Rs 5,000 crore in Maharashtra. This decision has been taken in consultation with the Central Government. The agreements were signed long before the Galvan Valley violence.
News English Title: The Maha Vikas Aghadi government has blocked three agreements with Chinese companies signed in Magnetic Maharashtra According to the agreement News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15x15x15 या सूत्राचा वापर करा, तुम्हाला करोडोचा परतावा मिळेल
-
RBI Monetary Policy | आरबीआयने रेपो रेट वाढवला, महागाई जगणं अवघड करणार, सर्व प्रकारच्या कर्जाचे EMI वाढणार
-
Viral Video | भाजपशासित राज्यात नरक यातना, अँब्युलन्स नाकारल्याने मृत आईचं शव बाईकवर बांधून मुलाचा 80 किमी प्रवास
-
Viral Video | हा श्वान व्हॉलीबॉल खेळण्यात किती तरबेज आहे पहा, खतरनाक टाईमिंगचा व्हायरल व्हिडिओ पहा
-
Credit Score | क्रेडिट स्कोअर संबंधित तुमच्या तक्रारींचं निरसन आरबीआय करणार, जाणून घ्या कसं