13 August 2020 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

आता कर्नाटकात देखील भाजप राज्य, येडियुरप्पा यांचा आज शपथविधी

b s yeddyurappa, CM b s yeddyurappa, BJP Karnataka, Karnataka Assembly, Kumarswamy

बंगळुरू : कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भाजप नेते येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहेत. त्यांनी राज्यपालांशी भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा यांनी सत्तास्थापनेचा दावा करताना १०५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले आहे. तसेच येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज दुपारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.

कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह फक्त ३४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप व बंडखोर आमदारांमधील ज्यांना मंत्रीपदे मिळणार नाहीत ते येडीयुरप्पा यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकतात. कर्नाटकात कोणीही सरकार स्थापन केले, तरी ते स्थिर राहू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x