12 December 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे तब्बल ३५६ नवे रुग्ण

Covid19, Corona Crisis

नवी दिल्ली, १४ एप्रिल: देशात कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १० हजार ३६३ वर पोहचला आहे.

दुसरीकडे कोरोनाचे एका दिवसात ३५६ रुग्ण आढळून आल्याने दिल्ली हादरली आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

 

News English Summary: Delhi has been shaken up by Corona’s finding of 356 patients a day. Such a large number of patients are reported for the first time in a day. The total number of corona patients in Delhi has increased to 1,510. Of these, 1071 patients are related to the Markaz, the Tablighi tribe in Nizamuddin.

News English Title: Story Corona virus 356 new cases arrived Delhi Monday total infected country 9352 Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x